घर भरले उखडून लाटणे टाळावे
उघड्यावर संसार थाटणे टाळावे …मतला (जमीन )
उडणाऱ्याचे पंख छाटणे टाळावे
परीवरी काल्पनिक भाळणे टाळावे .. हुस्न ए मतला
देणाऱ्याचे भाव न कळती प्रत्येका
कैक पुस्तके फुकट वाटणे टाळावे
गरज किती तव इच्छा म्हणुनी वाढविशी
परधन वनिता भोग बाटणे टाळावे
पुरणाचा कट जमून येण्या सारावर
घाई करुनी डाळ हाटणे टाळावे
पोट भराया कोणाच्याही बाळाच्या
टाळूवरले तेल चाटणे टाळावे
चूक बरोबर कळले ज्याचे त्याला तर
मक्त्यामध्ये नाव गुंफणे त टाळावे