पावलात दो तिडी असूदे
वा दुर्वांची जुडी असूदे
हळद उतरण्या अंध रुढींची
दोन नयांची शिडी असूदे
मुक्तक झाले पूर्ण तरी पण
तिसऱ्या शेरी उडी असूदे
शरी कुडीतच जीव जरी रे
ऊर्ध्व गतीची छडी असूदे
रत्नत्रय अंतरी सुनेत्रा
सिद्ध गझल पोतडी असूदे
पावलात दो तिडी असूदे
वा दुर्वांची जुडी असूदे
हळद उतरण्या अंध रुढींची
दोन नयांची शिडी असूदे
मुक्तक झाले पूर्ण तरी पण
तिसऱ्या शेरी उडी असूदे
शरी कुडीतच जीव जरी रे
ऊर्ध्व गतीची छडी असूदे
रत्नत्रय अंतरी सुनेत्रा
सिद्ध गझल पोतडी असूदे