आत्म्यात काय नाही आत्म्यात सर्व काही
सरसाव आज बाही आत्म्यात सर्व काही
आहे अभंग अजुनी देऊळ देह मंदिर
हृदयात ज्योत राही आत्म्यात सर्व काही
तावून ठाकले हे चारित्र्य शुद्ध माझे
देण्या स्वतःस ग्वाही आत्म्यात सर्व काही
मम मातृभाव प्रीती जगण्यास श्वास पुरवी
गर्भात धर्म दाही आत्म्यात सर्व काही
ठिणगी उरी सुनेत्रा कर्मांस खाक करण्या
अवगत मला कला ही आत्म्यात सर्व काही