पोट भराया येतो घरला – POT BHARAYA YETO GHARALA ( I come home to fill my stomach)


पोट भराया येतो घरला गोड धोड मज नको नको
वाढ भाकरी चतकुर अर्धी हाड हाड तू करू नको
करून योगा स्लीम जाहलो रोड रोड तू म्हणू नको
जरा गोबरे गाल जाहले जाड जाड तू करू नको
झोपूदे मज तप्त दुपारी वाड वाड  तू बकू नको
फळी हलवुनी भांडीकुंडी धाड धाड तू पाडु नको
पत्र प्रियेचे येता मजला ताड ताड तू उडू नको
एकांती वाचावे म्हणतो फोड फोड तू म्हणू नको
प्रीत-फुलांवर लिहिता काही खोड खोड तू करू नको
ओढुन ताणुन पान फाडुनी जोड जोड तू करू नको
नाद खरा मज गझलेचागं सोड सोड तू म्हणू नको
मम गझलांनी झाड बहरले तोड तोड तू करू नको


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.