जेंव्हा मला स्मरे तव प्राचीन कर्म वेडे
होतात त्या क्षणी मम शुभ भाव नर्म वेडे
निष्पाप मूक प्राणी करुनी शिकार त्यांची
थैल्या खुशाल शिवती सोलून चर्म वेडे
जपण्यास जीव माझा मी आत्मधर्म जपते
उचलून पंथ धरती त्यागून धर्म वेडे
त्यांना न साधले जे आम्हास साधता रे
का बोट ठेवताती धुंडून वर्म वेडे
टाकून बोलताती बोलून टाकताती
सत्यास पूजताती जाणून मर्म वेडे