फळकुटे – FALHAKUTE


शहरगावी सून आली राहण्या
एक खोली मून झाली राहण्या
घासलेटी स्टोव्ह होता रांधण्या
सोबतीला जून पाली राहण्या
घासुनी फरशीस देण्या चारुता
गुणगुणे ती धून चाली राहण्या
ओसरी नव्हतीच नव्हते स्नानघर
फळकुटे जोडून न्हाली राहण्या
शेत नाही तिज स्वतःचे राबण्या
राबतेय विणून शाली राहण्या
पाठ छहढालास करुनी आज तू
आणल्या जिंकून ढाली राहण्या
लागला लग्गा कुणा सट्ट्यावरी
आकडा रेखून भाली राहण्या
बाष्प होता कोंडलेल्या भावना
सांडलेना ऊन गाली राहण्या
कैक होत्या आवडी अन नावडी
पातले घेऊन खाली राहण्या
रक्तिमा पूर्वेस चढता पाखरे
रंगली लेऊन लाली राहण्या
उदक नाही लहर नाही औषधा
काढली झाडून नाली राहण्या
गौर ज्वाळामालिनी जाते बरे
मंदिरी होऊन काली राहण्या
शीव आंतरजाल पुन्हा नेटके
मत्स्य तो पकडून जाली राहण्या
मानिनी बांधून न्हाणी शौचघर
आणते शोधून वाली राहण्या
साठला कचरा जरी तो रोजचा
त्यास ती दाबून घाली राहण्या
पाळल्या ना कोंबड्या पण पारवे
ना तया कोंडून डाली राहण्या
दाखले देता कशाला गाडण्या
आगमे कोळून प्याली राहण्या
गझल माझी भीत नाही गावया
सूर लय पकडून ताली राहण्या
संपवीण्या मी सुनेत्रा नाटके
काढल्या सोलून साली राहण्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.