चतुर्दशीला मनी नारकी युद्ध पेटले माजाचे
तीव्र कामना अंगांगातुन रंग पेटले माजाचे
मायाचारी कुटील नीती वक्रपणाने उचंबळे
एक तडाखा बसता फुटुनी बीळ पेटले माजाचे
सैरावैरा सर्प धावती शोधायाला नवी बिळे
धपापणारे मूळ वाळके खोड पेटले माजाचे
कुठे न थारा मिळता जुळता कात टाकुनी सळसळते
लाळ साठवुन पिंक टाकता यंत्र पेटले माजाचे
रसशाळा जणु इथे उघडली ढंग भंग सरणार कधी
कर्मनिर्जरा करण्या सत्त्वर बेंड पेटले माजाचे
बँड वरातीपुढचा वाजे पथक चालले पुढे पुढे
अडता घोडे सात देखणे टोक पेटले माजाचे
चाबुक हाती तुझ्या “सुनेत्रा” गुंडाळाया टोकाला
गुंडाळीला आग जाळते काष्ठ पेटले माजाचे