खेळ मांडावा धरावा पकडण्यासाठी
पकडलेले सोडताना पडू नये कोणी
भाव आहे आर्जवाचा घडवण्यासाठी
जे हवे ते घडत जाता झडू नये कोणी
मुक्तछंदातून बंधन बहरते आहे
भूतकाळाच्या तणावर नडू नये कोणी
वाडवडिलांची खरी रे पूर्वपुण्याई
साथ मिळता प्रीतिची खडखडू नये कोणी
झरत जाता शेर ऐसे निर्झरावाणी
सावळ्या गझलीयतेला खुडू नये कोणी
कोणत्या गोष्टीत माझ्या नाव अपुले ना
मी अशी सर्वत्र मजला पिडू नये कोणी
मोह सुंदर मम “सुनेत्रा” का बरे टाळू
लागता दारास टाळा टळू नये कोणी