आत आत अंतरात बीजमंत्र घुमतात
आत हृदय सप्तकात बीजमंत्र घुमतात
गा ल गा ल गा व ली य इंग्रजीत ललबाय
आत गर्भ गीत गात बीजमंत्र घुमतात
सागरात गाजणार लहर लाट खिरणार
आत खिरत एकजात बीजमंत्र घुमतात
गोल घुमट आस सरळ वर्तमान भुतकाळ
आत हात कंकणात बीजमंत्र घुमतात
नाम गजर झांज टाळ अक्षरून फुलबाग
आत वळुन करत मात बीजमंत्र घुमतात