बुलबुल गाणारे – BULBUL GAANAARE


टेकडीच्या वाटेवर बुलबुल गाणारे  .. बुलबुल गाणारे…
फांदीवर घेत ताना खळखळ गाणारे .. बुलबुल गाणारे …

शिशिराची वेळ आली निरोप घेण्याची .. निरोप देण्याची …
हिवसाळी उकाड्यात शिव शिव गाणारे .. बुलबुल गाणारे …

दोन पाच लक्ष कोटी संगे रुपयांच्या.. संगे माझ्यासह
सोनियांच्या नाण्यांसह खणखण गाणारे .. बुलबुल गाणारे …

मागेपुढे चालता ठेक्याचे पावले .. आतील आवाज …
हृदयाच्या ठोक्यांसवे  गुणगुण गाणारे .. बुलबुल गाणारे …

“सुनेत्रा” च्या गझलेला संगीत देतात ..जीवांस जगाया …
आवाजात माधुर्यात जिन जिन गाणारे.. बुलबुल गाणारे …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.