गालगागा गाल गागा मोज मात्रा गा ल गा गा
अंधश्रद्धा सोड मूढा सत्य आत्मा ढाल गागा
नाव नाना अर्थ सांगे जो हवा तो घे उशाला
साद देई मग पहाटे अंतरीचा ताल गा गा
मी ममत्त्वाच्याच मोही म्हण हवे तर भावबंधन
गात तुज जगण्यास मोदे शिकविते मी चाल गा गा
लहरते रंगीत थंडी देतसे संगीत निर्झर
दो सुयांवर विणत जाळे घे लपेटुन शाल गागा
चिंब गझला भिजून सुकती शीड हलता गलबताचे
उतरुनी तू घे सुनेत्रा ग्रंथरूपी माल गागा