तरही गझल
गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची
गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची
कुठे मनाला खोलायाची सोयच नाही आता
म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता
म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता
इतुके त्यांनी जीव कोलले मनोरंजनासाठी
विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता
विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता
नंदीबैलासमान त्यांनी डोलविल्यावर माना
सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता
सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता
मीच कातडे सोलत जाता माझ्या कायेवरले
पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता
पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता
मुग्ध भावना टिपता टिपता नकळत तोलत जाते
जडास कोणी तोलायाची सोयच नाही आता
जडास कोणी तोलायाची सोयच नाही आता