गाता गझल गीत लिहिले मक्त्यात नाव रक्ताने
रक्तपात टळण्या केला पुन्हा मज्जाव रक्ताने
पाऊलवाट मळवाया का रचू डाव रक्ताने
शब्दांनी भळभळणारे का भरू घाव रक्ताने
औषधा मसी ना उरली लेखणी शिशाविन पोकळ
भेदले लक्ष्य बाणाने हेरून भाव रक्ताने
चटक ना रक्त मासाची पुरविण्या लाड रसनेचे
हे हृदय न कत्तलखाना बुडविण्या हाव रक्ताने
सळसळते सत्य रक्तात जीवाचा धर्म अहिंसा
मग लिहू सुनेत्रा का मी व्हाया लिलाव रक्ताने