पावसात न्हात गात चिंब चिम्ब भिजणारच
ओलेत्या वस्त्रांना हलके मी पिळणारच
वाऱ्यावर स्वार होत आभाळी फिरणारच
क्षमा मार्दवात धर्म आर्जवास मिळणारच
धो धो धो धबधब्यात शुचिता मम हसणारच
टपटपत्या वसनांतुन नीर क्षीर झरणारच
सत्याला भिजवाया पळापळी करणारच
एक मूळ खोड जुने कर्माने जळणारच
खाक होत राख होत पाण्याला मिळणारच
उपजत मम संयम बघ उन्हामधे तपणारच
कृष्णमेघ हळूहळू झेप घेत उडणारच
त्यागुनिया जलदांतिल जीवनास धरणारच
अकिंचन्य ब्रह्मचर्य आत आत वळणारच
सुनेत्रात अंतरात मंत्र णमो घुमणारच