मळ्या रे – MLYAA RE


नको अळू तू स्वतः तरीपण ढगांस श्यामल अळस मळ्या रे
गगन गिरीच्या नक्षत्रांची वार्ता मजला कळस मळ्या रे
धरे क्षीरधर अखंड धारा डोंगरमाथी कुरळ कुंतली
दुग्ध तपविता किरण रवीचे सांजेला ते हळस मळ्या रे
हिमवृष्टी करतात जलद अन निळ्या पहाडा नमिता चपला
उजळे कातळ गाढ झोपला सत्वर त्याला यळस मळ्या रे
मुक्त ओंजळी उधळत धो धो अनंत पदरी मौक्तिक माला
सुंदर व्रतधारक भूमीवर हरित धनाला ब्यळस मळ्या रे
तू तर दाता देण्यासाठी कसा मोकळा करत राहशी
मृत्तिकेतल्या जीवां रुजवत तुला हवे ते घळस मळ्या रे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.