रंगपिशी अन काव्यपिशी
नित्य पडे प्रेमात कशी
पडुनी उठुनी चालतसे
अंध नव्हे पडण्यास फशी
ललित लिहाया सलिल निळे
बनुन झरे मी सहज अशी
कर्म कराया ना डरते
धर्म अहिंसा जपत मशी
भीक न द्याया लागो रे
कामच देते खुशी खुशी
सांग मला हे सांग खरे
लावावी का परत भिशी
गाळ कपातच तू कॉफी
ठेवाया कप आण बशी
कानी कुंडल नथ नाकी
कंठी शोभे साज ठुशी
माळ जयाची घाल गळा
होत सुनेत्रा आत्मपिशी
लगावली – गागागागा/ गागागा/