शांत चित्त शुद्ध देह माय तृप्त चिंतनात
सांग याहुनी महान ईश कोणता जगात
मेंढरे जरी बरी खरी हुशार माकडेच
जांभळ्या फळांस गोड ठेवतात काळजात
एक शेर जादुगार मम सुनेत्र त्यात दोन
जांभुळासमान गडद काळजास छेडतात
अर्घ्यरूप आसवात चिंब जाहलेय बिंब
पाहतेय ऐकतेय उमटतेय मौन रात
अंतरात लावलीस जी अजून तेवतेय
ना हलेल अन विझेल वादळात सांजवात