ललकारी – LALKAAREE


कशी निवडून घ्यावी नोकरी मी छान सरकारी
मला रे मूड कोठे आजही देण्यास ललकारी

मुलांना पाहुनी आता शिकाया नियम सृष्टीचे
घराच्या परसदारी अंगणी लावेन तरकारी

करांनी कैक लिहिता उमटल्या गझला करामत ही
पुरे चर्चा कराला कोठल्या म्हणतात अबकारी

झळांनी पेटणे नाही हिमाने गोठणे नाही
जिवाने कोष विणणे ते नसावे त्यास भयकारी

लिहावे नाव म्हणते कोरुनी मक्त्यात सोनेरी
कशी द्यावी कुणी द्यावी सुनेत्रा सांग ललकारी
लगावली- लगागा/ ४ वेळा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.