धादांत खोटे बोलले मी
पण क्लांत खोटे बोलले मी
कोंडीत लोंढा दाटलेला
मन शांत खोटे बोलले मी
जे जे हवे ते प्राप्त होता
मज भ्रांत खोटे बोलले मी
अज्ञान माझे दावण्यास्तव
ते प्रांत खोटे बोलले मी
बोंबा खऱ्या होत्या जरी त्या
आकांत खोटे बोलले मी
धादांत खोटे बोलले मी
पण क्लांत खोटे बोलले मी
कोंडीत लोंढा दाटलेला
मन शांत खोटे बोलले मी
जे जे हवे ते प्राप्त होता
मज भ्रांत खोटे बोलले मी
अज्ञान माझे दावण्यास्तव
ते प्रांत खोटे बोलले मी
बोंबा खऱ्या होत्या जरी त्या
आकांत खोटे बोलले मी