चाळणे मातीस आता सोड दोस्ता
माय माती लाल काळी गोड दोस्ता
रंगरूपाचीच चर्चा बोर करते
तू मनाला आत्मियाशी जोड दोस्ता
तोच डोंगर घाट सोपा जाहल्यावर
घेच आता वेगळा तू मोड दोस्ता
बांधुनी पद्यात तत्वे टेस्ट केली
घे लिहाया गुणगुणुनी कोड दोस्ता
शेवटाचा शेर येता नाव माझे
गुंफण्याची सवय आता छोड दोस्ता
आवडे मज नाव माझे म्हणुन लिहिते
तू फुका घेशी कशाला लोड दोस्ता
चेच शब्दां नेच शब्दां तू फिराया
लागता पण ठेच त्यांना खोड दोस्ता