मस्तपैकी मी लिहावे नित्य काही
मस्त बाकी तू जपावे नित्य काही
कल्पना माझी असो की त्या फुलाची
मस्त आणिक छान द्यावे नित्य काही
संगती एकांत नाजुक सांज प्याले
मस्त साकी तू भरावे नित्य काही
गोठलेल्या काफियांची आ अलामत
मस्त बदले मी पुरावे नित्य काही
मी न माने अन जुमाने पुद्गलाला
मस्त माझे मी स्मरावे नित्य काही
कैक वेढे कैक वाडे मोज काने
मस्त बाणे मी विणावे नित्य काही
मी सुनेत्रा शेर माझा गझल माझी
मस्त मी मज देत जावे नित्य काही