पत्थराला शेंदराने लिंपणे
सोड आता देव असले पूजणे
व्यर्थ नाही क्षीर नागा पाजणे
कारल्याला पाक घालुन मुरवणे
नाद केव्हा सोडशिल तू सांग हा
चढत जात्या पावलांना ओढणे
घालता गुंफून माळा तू गळा
वाटते ना ते मला मग लोढणे
धावती मागून माझ्या काफिये
फार झाले शर्यतीतून धावणे
तिंबली ऐसी कणिक मी चेचुनी
शस्त्र माझे सज्ज बघ हे लाटणे
पोळपाटी लाटण्याला फिरव तू
बास झाले कणिक उंडा ठोकणे
उडवला होता जरी मम शेर तू
भाव माझा ना जमे तुज झाकणे
कोण मालक कोण नोकर जाणते
मी सुनेत्रा सोडते ना पाजणे