सांजवेळ रम्य होत लाल भाळ जाहले
भारतीय भू स वंदण्यास काळ जाहले
भाळ काळ जाहलेय नमविण्यास शत्रुला
कूट प्रश्न उलगडून मी गव्हाळ जाहले
कंटकांस खात खात वर्तमान पचवुनी
स्वागतास सज्ज शुभ्र पुष्पमाळ जाहले
मौन घेतले जरी तयास आज त्यागुनी
जाळण्यास वाजण्यास जाळ टाळ जाहले
रंगरूप आरशात पाहताच रंगले
रंगरंगुनी नशेत सान बाळ जाहले