झळझळीत प्रकृती संस्कृती
पारस पद्मावती संस्कृती
धरणीधर शासन देवांची
पूर्ण सिद्धता मती संस्कृती
संस्क्रित संस्कृत वैय्याकरणी
ग्रामर ग्राहक गती संस्कृती
सहज लीलया बोल इंग्रजी
माय मऱ्हाटी जिती संस्कृती
आजी माजी भावी शोभे
जैन ‘सुनेत्रा’ सती संस्कृती