सलील – SALEEL


पाऊस थांबलेला काठावरील गावी
पंचायतीत गप्पा गोष्टीत शील गावी

मतला असेल वा हा म्हणती जमीन याला
ओसाड माळ बघण्या वाटे न थ्रील गावी

शहरात काम नाही ना राहण्यास थारा
जातात गांजलेले करण्यास डील गावी

सोडून पिंजऱ्याला गेले उडून पक्षी
आता न अनुभवाया तो स्वस्थ फील गावी

शिवलेय तोंड वाटे प्रत्येक माणसाचे
मिळते न ऐकण्या ते गाणे सलील गावी

बुचबंद बाटल्यांचा व्यापार पाणियाचा
घेतात पारखूनी तोडून सील गावी

गझला इथे लिहाया नाही कुणास बंदी
गझला कश्या लिहू मी राहून चील गावी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.