स्वभावात आनंदी आहे
जिनांचीच अनुयायी आहे
जिनशासन सत शासन आहे
सोळाकारण भक्ती आहे
लाल रेघ हे यंत्र मारते
आतमशक्ती मंत्री आहे
खुशीत मात्रा मोजत असते
शेरांचीच लढाई आहे
गुणगुणल्यावर सहज मोजते
अलामतीवर प्रीती आहे
नाव सुनेत्रा मक्त्यामध्ये
गझल रतन मम युक्ती आहे