दोन रुबाया
स्वातंत्र्य…
स्वातंत्र्य प्रिय मज अम्हा तुम्हा हर जीवा
ना मात्रा अक्षर अडकविती मम जीवा
संपले प्रश्न हे गूढ मूढ छळणारे
व्हावयास राख पाप कर्म जळणारे
सोवळे…
सोवळे उतरवलेय ओवळे नेसायाला
का लाऊन घ्यावे अंगा वल्कल नेसाया
नेसते रुबाई नऊवार पैठणी इरकल
खांद्यावर शाल गझल जणु ढाक्याची मलमल