मोरचुदाचे स्फटिक उडाले
घनमालेतुन परतुन आले
मेंदीच्या गंधाचा शिरवा
प्राशुन भुंगे वेडे झाले
काव्याच्या किमयेने भिजल्या
हृदयामधले मिथ्य गळाले
खडकांवर वर्षाव करूनी
त्यागुन काया मेघ निघाले
झिम्मा फुगडी घालत वारा
फांदीवरती पिंगा घाले
मोरचुदाचे स्फटिक उडाले
घनमालेतुन परतुन आले
मेंदीच्या गंधाचा शिरवा
प्राशुन भुंगे वेडे झाले
काव्याच्या किमयेने भिजल्या
हृदयामधले मिथ्य गळाले
खडकांवर वर्षाव करूनी
त्यागुन काया मेघ निघाले
झिम्मा फुगडी घालत वारा
फांदीवरती पिंगा घाले