तुझ्या नि माझ्या दुःखामध्ये अंतर आहे
पाण्याविन ही जमीन माझी बंजर आहे
पाण्याविन ही जमीन माझी बंजर आहे
अंतरातल्या मम दुःखाला रंगरूप ना
रंगरुपाहुन स्वभाव त्याचा सुंदर आहे
रंगरुपाहुन स्वभाव त्याचा सुंदर आहे
दुःखाला मी करुन दिगंबर निर्भय झाले
माझ्यासाठी हाच सुखाचा मंतर आहे
माझ्यासाठी हाच सुखाचा मंतर आहे
कैक आयड्या करून वेड्या गझला लिहिल्या
त्या गझलांचे गोठ्यामध्ये झुंबर आहे
त्या गझलांचे गोठ्यामध्ये झुंबर आहे
गोठ्यामधल्या जित्राबांचे शेण काढुनी
सारवलेल्या जमिनीवरती लंगर आहे
सारवलेल्या जमिनीवरती लंगर आहे
शेणकुटे मी रोज थापते भिंतीवरती
राखाया ती एक पाळले मांजर आहे
राखाया ती एक पाळले मांजर आहे
शेणकुटातिल उडून पाणी बाष्प जाहले
त्या बाष्पावर जे चाले ते बम्पर आहे
त्या बाष्पावर जे चाले ते बम्पर आहे
शेर आठवा पूर्ण कराया मक्ता लिहुका
मक्त्याहुन प्रिय पण मज निळसर अंबर आहे
मक्त्याहुन प्रिय पण मज निळसर अंबर आहे
आईसाठी मक्ता लिहिते तिची सुनेत्रा
तिच्याचसाठी अजून कंठी हंबर आहे
तिच्याचसाठी अजून कंठी हंबर आहे