हुमान – HUMAAN


कोडे कसले हुमान हे तर
माझ्यामधले इमान हे तर

गगन भरारी घडवायाला
दारी आले विमान हे तर

लपवुन काही कशास ठेवे
मला दावते गुमान हे तर

मन माझे मज मुक्त सोडते
करे न कधी अनमान हे तर

भरून माझ्या अंतरात रे
सदैव राखुन मान हे तर

अश्रू नेत्रांमधून गाळू
काम करूया किमान हे तर

सामानावर शब्द सुनेत्रा
सुमान नाही समान हे तर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.