मुस्तजाद गझल
म्हणती कोणी ! फतरी पाने ! हे तर सोने !!
मधुघट भरला ! शांत रसाने ! हे तर सोने !
तपली भिजली ! अबला कसली ! बलाच असली !
भर गाभारा ! मृदगंधाने ! हे तर सोने !
गजबज तारे ! अवस अंबरी ! पुनव अंतरी !
घे टिप संधी ! शर संधाने !! हे तर सोने !
कातर वेळा … निरभ्र अंबर .. झरते झरझर…
दिवेलागणी .. मन दीवाने ,,, हे तर सोने !
गझल सुनेत्रा …सरळ माधवी … तरल मानवी …
निर्झर गाणे ,,,हिरवी राने … हे तर सोने…