मम जीव सैनी आहे
स्याद्वाद जैनी आहे
माझ्यावरीच फिदा मी
काव्यात चैनी आहे
करवंद काळी जाळी
मैनेत मैनी आहे
श्रद्धा जिनायतनावर
बिंबात ऐनी आहे
प्रतिके अशी स्मरणीची
मासा असैनी आहे
दे जीवदान तयांना
नवरात्र रैनी आहे
छाटावया चुकांना
कलदार पैनी आहे
काहून घेऊ राज्या
पाळीत वैनी आहे
जागी सदैव “सुनेत्रा”
लिहिण्या सुसैनी आहे