सहज सोपे
आवडले हाइकु
नकोच जोखू
गोडवा राखू
एवढ्या तेवढ्याने
नको भडकू
नको तडकू
गुलाबजल शिम्पू
भेगांना झाकू
लाव तंबोरा
जुन्या आठवणींच्या
जुळव तारा
समुद्र खारा
आपल्यासाठीच हा
मोसमी वारा
चढता पारा
वळिवाचा पाऊस
टपोऱ्या गारा
वादळ झेल
हरतेस कशाला
त्याच्याशी खेळ
प्रेमच प्रेम
भिंतीवर बसली
फोटोची फ्रेम
रसाळ गोड
घोलवडचे चिक्कू
कशाला विकू
खास दिसावी
वसईच्या केळ्यांची
बाग फळावी
पौषात राव
नाशिकच्या द्राक्षांना
भलता भाव
सुनेत्रासंगे
नागपुरची संत्री
चल पिकवू