मतदानाला जाऊ सारे
निघा घरातुन बाहेर
मतदानाचे केंद्र सुरक्षित
जणू साजिरे माहेर
प्रातःकाळी उठून सगळी
कामे करुया भरभर
केंद्रावरती गर्दी होता
रांगा लावू झरझर
आठवणीने घेउन जाऊ
ओळखपत्रे खरीखुरी
मतदानाचा हक्क बजावुन
आनंदाने येऊ घरी
नको गुलामी पाय चाटणे
स्व-अभिमानी बनू बरे
अंधश्रद्धा पूर्ण उखडणे
हे तर माझे ब्रीद खरे