सकाळी सकाळी काऊ साद घाली
हाक ऐकुनी ती मला जाग आली
हवा पावसाची किती छान वाटे
फुलांभोवतीचे जणू रम्य काटे
घटा सावळी ती जशी कृष्णबाला
कुणी घातल्या या नभी मेघमाला
बाग नाचते ही स्वैर वारियाने
कुहुकार केला तिथे कोकिळाने
ट्विटरच्रिपर ट्विटरच्रिपर नाद वेगळे हे
घुडू घुडू खुडू खुडू बोल आगळे ते
पावसाच्या स्वागताला पाखरे गाताती
काऊ चिऊ कोकिळेच्या संगे नाचताती