आधी वाचल्या पुणेरी पाट्या
नंतर घेतल्या ताट अन वाट्या
बाप म्हणाला असंच कर
तसंच केलं
आय बोलली मौनातच
पोर कामातून गेलं
पुणेरी पाट्या पुणेरी सैनी
करतोय लग्न पुणेरी जैनी
भैन म्हणतेय आण रे वैनी
मैत्रीण म्हणते हाक मार
जीव होईल गार गार
आजचा दिवस करेन पार
लेखणी तापली चढली धार
सपासपा करतीय वार
चल चल सई लाव लाव फोन
बोन्साय कोलतंय बोलतंय कोण
आम्ही सारे पुणेरी जैन
वाईन न्हायबा पितोय वैन
तेवढीच आपली पुणेरी चैन