नशीब म्हणजे नवी भरारी!
स्वतःच घ्याया हवी भरारी!!
प्रभात होता!! कुणी निशाचर!
म्हणेल घेना रवी भरारी!!
सुजाण या! मैफलीत माझ्या…
असेल ही भैरवी भरारी!!!!
पिसे गझलचे! नभी तरंगे!!
तनू तिची!आळवी भरारी!
हृदय असे हे!! बुलंद माझे!!!
विधीलिखित- वाकवी भरारी!!!
वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६
लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा गा