निवृत्त मी होऊ कशी
अदृश्य मी होऊ कशी
येतेच लक्ष्मी द्यावया
कंगाल मी होऊ कशी
मैत्रीण माझी शारदा
मतिमंद मी होऊ कशी
सौंदर्य साधे लाभले
जड कुरुप मी होऊ कशी
मज लेकुरे बोलावती
मुकबधिर मी होऊ कशी
जोहार करिता बालिका
अंगार मी होऊ कशी
माथ्यावरी ना सावली
हिमगौर मी होऊ कशी
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/