का पसरले झोळीस तू
गोंजारले टोळीस तू
का तेल पुन्हा ओतले
भडकावण्या होळीस तू
ते हात सुंदर साजिरे
का बांधले मोळीस तू
का ठेवला पत्रा जुना
भाजावया पोळीस तू
पुरुषार्थ मोठा दावला
खिजवून त्या भोळीस तू
जर लाज तुज ना वाटली
का खोडले ओळीस तू
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/