कोणास ना बोले कुणी
पण बोलते हृदयातुनी
व्यवहार जो जाणे खरा
तो निश्चयी आहे गुणी
मी काफियाने बांधली
कविताच ती होती जुनी
जेव्हा तिला तू डिवचले
ती बोलली फुत्कारुनी
हे वृत्त आहे बेरकी
अन गझल माझी देखणी
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/