दिवाळीत कोणी दिव्यांना पुजावे
कुणी ठोकलेल्या बुडांना पुजावे
खिळे ठोकताना कधी बोट चेपे
म्हणोनीच बत्ते विळ्यांना पुजावे
खलाचे वजन या तुला पेलवेना
सहज पेलती त्या कळ्यांना पुजावे
फुका ना तुम्हाला फुले रोज मिळती
कळ्या फुलविणाऱ्या झऱ्यांना पुजावे
सदा दान देती रिकामेच होती
जुन्या फाटक्या त्या खिशांना पुजावे
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल गा गा