सांजरम्य गझला माझ्या पुन्हा पुन्हा वाच
वाचण्यास मिटल्या नेत्रा उघड एकदाच
पहा नीट बिंबा तुझिया लोचनात दोन
सांडुदेत अश्रू होतो पापण्यांस जाच
टाळशील भेटीगाठी किती काळ सांग
खरेखुरे सांगायाला हवी काय लाच
मधुर मधुर बोलायाला चांदण्यात न्हात
अंबरात चंद्रालाही म्हणूयात नाच
पावसास पाडायाला आतुरले मेघ
गोष्ट नवी कोरी लिहिण्या ओंजळीत साच
शब्द निळे लहरत येता बासरीत धून
पंचप्राण गोळा हृदयी जरी भिन्न पाच
मात्रावृत्त – (६+८+६+३= २३ मात्रा)