हातामध्ये हात गुंफुनी सुखदुःखे झेलू
भरतीच्या लाटांत न्हाऊनी चिंब चिंब होऊ
प्रेमरतन धन प्रेमधर्म हा अंतरात जपुनी
उधाणलेल्या प्रीत सागरा भाव अर्घ्य वाहू
भरती वा ओहोटी असुदे जलामधे उतरू
भवसागर हा पार कराया नावाडी होऊ
लेखणीने वल्हवीत नेऊ पैलतटावर नाव
वसवू तेथे जीव-अजिवाचे छान आगळे गांव
विविध लिपीतुन एक लिपी शोधून अशी काढू
दिव्यध्वनीतिल अक्षर व्यंजन अचुक त्यात बसवू
डेसीमल अन बायनरीच्या ऐक्यातून घडीव
ब्रह्मांडी अवतरली सुंदर अंकाक्षरी सुनीव