गोमंतक भू वरचा सुंदर स्वर्ग जणू आहे
गोमंतक सृष्टीदेवीचा वर्ण जणू आहे
काव्य झराया सदैव अनुकूल निसर्ग गोव्याचा
गोमंतक काव्याचा आशय गर्भ जणू आहे
अक्षरपंखी पुष्पपऱ्यांच्या सुगंध यात्रेची
गोमंतक निर्मिती जादुई अर्थ जणू आहे
अतिथी देवासमान मानुन तृप्त त्यांस करणे
गोमंतक देशाचा हा तर धर्म जणू आहे
सोनेरी भूमीत दिव्य या वनमंदिर शोभें
गोमंतक आगम ग्रंथांचा पर्व जणू आहे
गझल मात्रावृत्त (१६/१०) २६ मात्रा