मनात माझिया तुझ्या तसेच ते असेलही नसेलही
तुला खरे कळूनही वळे न ते असेलही नसेलही
हवेत मस्त गारवा तशात गात चालले धुके निळे
तुला न का मलाच ते लपेटते असेलही नसेलही
कधीतरी कुठेतरी तुला निवांत भेटण्यास यायचे
कशास ही खुळ्यापरी मनोगते असेलही नसेलही
दवात चिंब न्हायल्यावरी तुला दिसे कुणी जळी स्थळी
विभोरता तुझी हवी मला लते असेलही नसेलही
अबोल तू अबोल मी परी मुळी न प्रीत ही लिहून तू
पुन्हा फिरून बोलतेस तेच ते असेलही नसेलही