नशिबाची ना हुजरी मी रे;प्राक्तन बिक्तन गुलाम माझे ..
म्हातारी ती गतकालातिल;आज तरुण ‘मी’ विराम,माझे …
माजी बाला आजी तरुणी;भविष्यातली होते वृद्धा ..
अवघ्या तरुणाईची आई;काळाला या सलाम माझे …
बुद्धीजीवी ज्ञान वाटती;ज्ञानच लुटती ज्ञानासाठी ..
कसणाऱ्यांच्या हाती बंदे!खणखणणारे छदाम माझे …
त्रिलोकातली दौलत सारी…….हृदयी माझ्या भरून वाहे ..
ब्रह्मांडातिल सुख शांतीमय;त्रिभुवनी पावन धाम माझे …
स्वर्ग उतरतो घरात माझ्या;क्षितिजावर नावेत बसूनी ..
माझ्या नावामध्ये झळके;गाव जरी हे अनाम माझे …