हिंदी उर्दू ग़ज़लेमध्ये नुक्ता भारी
मराठीतला शब्द स्वस्त मग सस्ता भारी
गज्जल झाली गजल गज़ल अन गझल शेवटी
या नावास्तव काढल्यात मी खस्ता भारी
लगीनघाई खरीखुरी ही आली बाई
गझलदालनी काढ भरजरी बस्ता भारी
रम्य हवेली माझी आहे तिथे जातसे
वळणावळणाचा गाणारा रस्ता भारी
तिरंग्यातल्या रंगी बुडवुन इथे सुनेत्रा
फिरव लेखणी सहज उमटण्या मक्ता भारी