समुदायाने सूतकताई
करे शांतीचा दूत कताई
भुंकत कुत्रे कुठे निघाले
जिथे करे रे भूत कताई
हत्ती पाळावया पोसण्या
करे रोज माहूत कताई
चरखा फिरवुन सहजपणाने
शिकवे करण्या पूत कताई
हडळ स्मशानी बसून करते
वस्त्रे नेसुन धूत कताई
चरख्याचे भांडार भराया
आला तुजला ऊत कताई