पाहणेही भोगणे अन ऐकणेही भोगणे
भोगणे हे पाप तर मग वाचणेही भोगणे
पापपुण्याच्या हिशेबी शून्य बाकी जेधवा
जीवनी रंगून जाणे डुंबणेही भोगणे
प्राशुनी वैशाख वणवा ढाळता वाफा धरा
तापल्या भूमीवरी त्या चालणेही भोगणे
प्यावया तव लाल रक्ता डास पिसवा चावती
डंख त्यांचा स्पर्श त्यांचा सोसणेही भोगणे
मच्छरांची कृष्ण चादर पांघरूनी बैसता
रात्र काळी गाळते ते चांदणेही भोगणे