तरही गझल
गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची
गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची
मतला माझा कुणा कधी ना पटतो दोस्ता
मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता
मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता
आवडलेल्या ओळीवरती तरही लिहिते
तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता
तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता
असे लिहावे तसे लिहावे डोस प्राशुनी
कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता
कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता
शब्दांवर का असे कुणाची सांग मालकी
नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो दोस्ता
नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो दोस्ता
मनापासुनी लिहिल्यावरती गझल उमटते
रसिक मनावर रंग गझलचा खुलतो दोस्ता
रसिक मनावर रंग गझलचा खुलतो दोस्ता